बीएमडब्ल्यू मालकाची मुजोरी: क्षुल्लक कारणावरून तरुणाच्या अंगावर घातली कार, बोनेटवरून पडून तरुणाचा मृत्यू - चंदीगड गुन्हेगारी न्यूज

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 4, 2022, 7:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

चंदीगड - चंदीगडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ ( crime rate in Chandigarh ) होत आहे. रात्री उशिरा सेक्टर 22 मध्ये अंगावर गाडी घालून अपघात केल्याची घटना समोर आली आहे. कारमध्ये स्वार झालेल्या काही लोकांनी एका तरुणाशी वाद घातल्यानंतर त्याला एका भीषण कारने धडक ( BMW hit youth in Chandigarh ) दिली. एवढेच नाही तर तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याला बोनेटवर ओढत लांबवर ( chandigarh roadrage video ) नेले. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारचा वेग इतका होता की कोणीही काही करू शकले नाही. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यावर उभ्या असलेल्या २४ वर्षीय शुभम आणि त्याच्या मित्रांचे कारचालक स्वपन प्रीतसोबत भांडण झाले. कारण, रस्त्यावर उभ्या असलेल्या या तरुणांच्या जवळ गाडीला अचानक त्याने ब्रेक लावला होता. यावेळी कारचालक स्वपन याने कारच्या समोरून जा, नाहीतर अंगावरी गाडी चालविणार असल्याची धमकी दिली. इकडे शुभम हा कारसमोरून हलला नाही. या वादात कारचालक स्वपनने शुभमच्या अंगावर कार घातली. शुभम कारच्या बोनेटवर पडला. पण स्वपनने कार न थांबविता तशीच सुमारे 100 मीटरपर्यंत नेली. पण पुढे गेल्यावर शुभम हा बोनेटवरून घसरला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापतीनंतर शुभमच्या मित्रांनी त्याला चंदीगड पीजीआयमध्ये दाखल केले जेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही ( CCTV video BMW hit youth ) समोर आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव स्वपन प्रीत असे असून तो नवांशहरचा रहिवासी असून तो जिम चालवतो. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची बीएमडब्ल्यू कारही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. 24 वर्षीय शुभम असे मृताचे नाव आहे. हा तरुण चंदीगडमधील कपड्याच्या दुकानात काम करायचा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.