भाजपाचा विजयोत्सव, चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचा जल्लोष; पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 4:04 PM IST

मुंबई : State Assembly Election Result 2023 : देशात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अर्थात लोकसभेच्या सेमिफायनलमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. मध्यप्रदेश राखताना भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहेत. मध्यप्रदेशमध्ये तब्बल 162 जागांवर तर राजस्थानमध्ये 111 जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये 199 जागा असून त्यात भाजपा 110, काँग्रेस 73 तर इतर 16 जागेवर आघाडीवर आहेत. तर मध्यप्रदेशमध्ये 230 पैकी भाजपा 161, काँग्रेस 66, इतर 3 जागेवर आघाडीवर आहेत. छत्तीसगडमध्ये 90 जागा असून त्यात भाजपा 54, काँग्रेस 34 इतर 2 आघाडीवर आहेत. तेलंगाणामध्ये 199 जागा असून काँग्रेस 65, बीएसआर 39, जागेवर आघाडीवर आहे.
 

मोदींचा जयजयकार : 'देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो' अशा प्रकारच्या घोषणांनी मुंबईमधील भाजपा कार्यालय परिसर दुमदुमून गेला. जस जसे निकाल हाती येत होते तस तसे भाजपा कार्यालया बाहेर गर्दी जमू लागली होती. भाजपा कार्यलया बाहेर मोठ्या प्रमाणावर सकाळी साडेअकरा वाजेपासूनच भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी जमण्यास सुरुवात झाली होती. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत, हातात भाजपाचा ध्वज घेऊन, ढोल ताशांच्या गजरात, फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी आशिष शेलार, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर, भाजपाचे पदाधिकारी या जल्लोषात सहभागी झाले होते. तर चार राज्याच्या निवडणुकीतील निकाल पाहता तीन राज्यात भाजपाला बहुमत मिळाल्यानं, पुणे शहरातही भाजपाकडून गुडलक चौकात मोठा जल्लोष करण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी यावेळी डान्स करत जय श्रीरामच्या गजरात फुगड्या खेळल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.