Dilip Ghosh On Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात, भाजप नेते दिलीप घोष यांनी वर्तवली 'ही' शक्यता - भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र दुसरीकडे भाजपने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले असून राष्ट्रवादी राज्यातील उरलेली सत्ता गमावत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे. यावेळी वृत्तसंस्थेला बोलताना दिलीप घोष यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी राज्यातील आपली उरलेली सत्ता गमावत असल्याचेही दिलीप घोष यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून उलटफेर शुरू होते. आतमध्ये अनेक घडामोडी घडत होत्या. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. विधानसभेला मतदारांनी दिलेला कौल योग्य होता, हे महाराष्ट्रातील आताच्या निर्णयावरुन दिसत असल्याचेही यावेळी घोष यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Sanjay Raut On Loksabha Election : देशात 2024 मध्ये सत्ता परिवर्तन होईल, चीनच्या आक्रमणावर सरकार गप्प का? - संजय राऊत