Bhingar Bandh: अहमदनगर शहरातील भिंगार आज बंद; औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी - औरंगजेबाचे पोस्टर
🎬 Watch Now: Feature Video

अहमदनगर : अहमदनगर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन काही तरुण नाचत असल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला भिंगारमध्ये असलेल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भिंगार बंदला सर्व दुकाने बंद ठेऊन एक प्रकारे पाठिंबा दिला आहे. औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने ही बंदची हाक दिली आहे. औरंगजेबाचा शेवट याच भिंगारमध्ये झाला होता, औरंजेबाला शेवटची अंघोळ ज्या चौथऱ्यावर घालण्यात आली होती, तो चौथरा याच भिंगारमध्ये आहे. तो उखडून फेकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता. त्यामुळे बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन समाजामध्ये तेड निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे फोटो झळकावणारे आरोपी शोधून त्यांना शासन करा, या मागणीसाठी भिंगार बंद आहे.