Friendship of Arif and Saras: मित्र आरिफचा आवाज ऐकून सारस झाला उतावीळ, कानपूरच्या प्राणिसंग्रहालयात झाली भेट - आरिफचा आवाज ऐकून सारस झाला उतावीळ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 11, 2023, 6:31 PM IST

कानपूर (उत्तरप्रदेश) : अमेठीचे रहिवासी आरिफ मंगळवारी समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ बाजपेयी यांच्यासह कानपूर प्राणीसंग्रहालयात पोहोचले. यादरम्यान दोघेही सुमारे 20 दिवसानंतर प्राणीसंग्रहालयात उपस्थित सारसला भेटले. सारसने त्याचा मित्र आरिफला पाहिल्यानंतर पिंजऱ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. आरिफने त्याला आतमध्ये उडण्यास सांगितले तेव्हा सारस आत पंख पसरून उडू लागला. हा करकोचा आपल्या मित्राला भेटण्यासाठी आतुर दिसत होता. अनेकवेळा तो स्वत:ला इजा करून घेईल असे वाटले. दोघांच्या भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे. प्राणिसंग्रहालयाचे डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करत आरीफची एन्क्लोजरमध्ये उपस्थित सारसशी भेट घालून दिली. आरिफ जवळ येताच 'कसा आहेस' असे म्हणत त्याला हाक मारली, त्यावर सारस पुन्हा-पुन्हा मान वर करू लागला. मित्राचा आवाज ऐकून करकोचा पुन्हा पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. आरिफने सारसला उडून दाखवायला सांगितल्यावर करकोचा आतमध्ये उडण्याचा प्रयत्न करू लागला. आरिफने उपस्थित डॉक्टरांना मित्राची काळजी घेण्यास सांगितले. सपाचे आमदार अमिताभ बाजपेयी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले की, सारसाच्या काळजीमध्ये कोणतीही कसर ठेवू नये. प्राणीसंग्रहालयाचे संचालक के के सिंह यांनी सांगितले की सारस असा पक्षी आहे, जो सहसा मैत्रीपूर्ण वागतो. ते म्हणाले की, हा पक्षी सहज पकडला जातो.

हेही वाचा: अबब, २५ कोटींची म्हैस..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.