Amruta Fadnavis in Managala Gaur: अमृता फडणवीस वर्सोवा यांची फुगडी बघितली का? फुगडी पाहून तुम्हीही घ्याल गिरक्या - मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 13, 2023, 7:49 AM IST

Updated : Aug 13, 2023, 8:38 AM IST

मुंबई: मंगळागौर म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक हळवा धागा आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील वर्सोव्यात सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात. वर्सोव्यातील नव्या पिढीला आपली परंपरा समजावी व जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत, यासाठी वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भाजपा आमदार आणि ‘ती’ फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती लव्हेकर यांनी श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवाचे आयोजन केले. हा कार्यक्रम जोगेश्वरी पश्चिममध्ये पार पडला.  या मंगळागौरी खेळात गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात 2000 हून अधिक महिलांची या मंगळागौर उत्सवात उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यक्रमात महिलांसोबत अमृता फडणवीस यांनी फुगडी खेळत आनंद लुटला. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की,  किती सुंदर स्त्रिया फुगड्या खेळल्या आहे.  हा एक व्यायाम प्रकार आहे. शिवाय मानसिकदृष्टीने सुखरूप राहण्यासाठीही  खूप चांगला पर्याय आहे. नागपूरमध्ये जाऊन काही काही मतदारसंघात मी मंगळागौर कार्यक्रम करणार असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Last Updated : Aug 13, 2023, 8:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.