Ambadas Danve Critisize गद्दारांच्या गर्जनेला किंमत नाही; अंबादास दानवेंची टीका - अंबादास दानवेंची टीका
🎬 Watch Now: Feature Video
Ambadas Danve Critisize मुंबई शिंदे गटाने राज्यात हिंदू गर्जना यात्रा काढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मात्र शिंदे गटाच्या या हिंदू गर्जना यात्रेला काहीही किंमत नाही, त्यांना कोणीही प्रतिसाद देणार नाही असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Criticism of Opposition Leader Ambadas Danve यांनी केला आहे. पालघर मध्ये जेव्हा साधू वर हल्ला झाला होता, तेव्हा काही लोकांनी आकाश पाताळ एक केले होते. आता सांगलीमध्ये जेव्हा साधूवर हल्ला करत मारहाण झाली आहे. तेव्हा हे लोक कुठे आहेत, हेच यांचे हिंदू रक्षण का असा सवाल करी दानवे यांनी म्हटले आहे, की साधून ना होणारी मारहाण आणि यांच्या हिंदू गर्जना यात्रेची घोषणा एकाच दिवशी झाली म्हणजे हे काय हिंदूंचे रक्षण करणार हे स्पष्ट होते. महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता आणि फॉक्स्वान या कंपन्यांचा बडा प्रोजेक्ट सध्या गुजरातला चालला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यात येऊ घातलेला आणि अंतिम टप्प्यात असलेला हा प्रकल्प या सरकारच्या स्थापनेनंतर गुजरातला कसा गेला ? यामध्ये गुजरातचे हित पाहणारे हे सरकार आहे का ? असा सवालही अंबादास दानवे Ambadas Danve Critisize यांनी यावेळी केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST