Ajit Pawar : ...नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना दम; पाहा व्हिडिओ - ajit pawar aggressive video
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. कार्यकर्त्यांना काही ना काही ते भर कार्यक्रमात सांगत असतात. आजही याची प्रचिती पुण्यात आली आहे. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बैठकीत मुळशी येथील पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी आपल्या शैलीत सुनावले आहे. राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. यावेळी ते म्हणाले की, वर्धापन दिनाच्या एक दिवसाआधी पक्षाचा मेळावा असून या मेळाव्यासाठी सर्वांनी तयारी करावी. मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील मेहनत घ्यावी. ज्यांना पक्षाने पद दिले आहे, त्यांनी भांडू नये. नाही तर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढणार असल्याचे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले आहे.