Ahmednagar Burning Train Fire Video : अहमदनगरमध्ये 'द बर्निंग ट्रेनचा थरार'; पाहा धगधगत्या आगीचा व्हिडिओ... - द बर्निंग ट्रेनचा थरार
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 16, 2023, 6:39 PM IST
अहमदनगर Ahmednagar Burning Train Fire Video : नगर-आष्टी रेल्वेला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. नगर जवळ वाळूंज शिवारात दुपारी तीनच्या सुमारास लागलेली आग पाच डब्यात पसरली. आधीच उशीर झालेल्या गाडीत प्रवाशांची संख्या अत्यंत कमी होती. आग लागल्याचं कळताच गाडी थांबल्यानं सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले. (Fire on Nagar Ashti train) तासाभरात आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र आगीत गाडीचं मोठे नुकसान झालं आहे. आता त्याचा धगधगता व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ( Fire on running train) आष्टीला गेलेली ही पॅसेंजर गाडी नगरकडे परतत होती. नारायणडोह ते नगर या दरम्यान वाळंजू शिवारात नगर-सोलापूर महामार्गाच्या क्रॉसिंगजवळून जात असताना इंजिनच्या मागील डब्याला आग लागली. पाहा व्हिडिओ...