Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
🎬 Watch Now: Feature Video
बीड : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीडच्या परळी तालुक्यातील गोगलगायने बाधित क्षेत्राचा पाहणी दौरा केला. वाघबेट गावातील जाऊन धनंजय मुंडे यांनी शँखी गोगलगायने बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. कोणतेही नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर आले तरी या संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. जरी उघड्या आभाळाखाली शेती करणाऱ्या शेतकऱ्याला राज्य सरकार उघड पडू देणार नाही,असे म्हणत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. परंतु मराठवाड्यात पाऊस पुरेसा पाऊस नसल्याची माहिती मुंडे यांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमी पाऊस असल्याने उत्पन्ना कमी निघेल,अशी चिंता आहे. दुसरीकडे गोगलगायचे संकट हे सगळे पीक खाऊन टाकतात. त्यामुळे जेवढी काय मदत शेतकऱ्यांना करता येणार आहे, तेवढी मदत करायचा निर्णय घेतल्याचे कृषीमंत्री मुंडे म्हणाले.