Gondia Flood: गोदिंयात पूर बघण्याचा अती उत्साह बेतला जीवावर; दोघेही गेले वाहून - Gondia rains update
🎬 Watch Now: Feature Video
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात ( Gondia rains update ) मंगळवारी रात्र भर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खुर्द येथील तीन युवक लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा तोल गेल्याने तीनही युवक नाल्याला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेले. याबाबतची माहिती कळताच बचाव पथकाला ( gondia flood situation ) ) पाचारण करण्यात आले. तीन युवकांपैकी एका युवकाला वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. पूरात वाहून गेलेल्या युवकांचे नाव आशिष बागळे (वय २४ वर्ष) व संजू बागळे (वय २७ वर्ष) असे आहे. हे दोघेही भाऊ आहेत. तर मित्र सागर परतेती (वय २८ वर्ष) याला वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. त्याकरीता बचाव पथकाने अधिकची चमू बोलावली आहे. नागरिकांच्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST