Sharad Pawar News: पवारांच्या एकेरी उल्लेखानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; भाजपच्या नेत्यांचे कुत्रीच्या तोंडावर लावले फोटो - harad Pawar
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18691112-thumbnail-16x9-bjp.jpg)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकर यांचा फोटो मॉर्फ करत कुत्र्याच्या तोंडावर यांचा फोटो लावण्यात आला. या पोस्टरवर राज्यात हे दोन कुत्री कुठे दिसल्यास त्वरित संपर्क करावा असे त्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काळे यांनी हे पोस्टर ठीक ठिकाणी लावले असून पवार यांच्या एकेरी उल्लेखचा निषेध केला आहे.