AAP Protest Against Brijbhushan Singh : ब्रिजभूषण यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे 'चप्पल मारो आंदोलन' - ब्रिजभूषण सिंग विरुद्ध आम आदमी पार्टीचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने 'चप्पल मारो आंदोलन' सुरू केले. आज मुंबईतील आम आदमी पार्टीतर्फे वर्सोवामध्ये भाजप विरुद्ध आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन देत मुंबईतील वर्सोवा भागात हे आंदोलन पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप गप्प का? भाजपचे आमदार खासदार ब्रिज भूषण सिंग यांनी केलेल्या महिला कुस्तीपटूच्या विनयभंगाविरुद्ध हे आंदोलन होते. ब्रिजभूषण सिंग त्यांच्यावर कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आप आंदोलकांनी दिली. विरोधक कुस्तीपटूंसोबत एकवटले असून त्यांच्या समर्थनार्थ सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी, भाजप प्रश्नांपासून का मागे पळत आहे? भाजप ब्रिजभूषण सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? अशा प्रश्न आम आदमी पार्टीकडून विचारला गेला.
मोदी सरकारची मौनीबाबाची भूमिका: एकीकडे कुस्तीपटू आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि पंतप्रधान मोदी कुस्तीपटूंबाबत मौन बाळगून आहेत. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाच्या मुलींच्या अश्रूंकडे पाठ फिरवत आहेत. कारण एकच आहे. पक्षाच्या नेत्याला वाचवण्यासाठी, ज्यांनी पदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या मुलींसोबत अभिमानाने फोटो क्लिक केले, ते आज या प्रकरणावर पूर्णपणे थंड आहेत. शुक्रवार, 28 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत, दिल्ली पोलिसांच्या वतीने एसजी तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, दिल्ली पोलीस कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून 'एफआयआर' नोंदवतील. त्यांनी कुस्तीपटूंना सुरक्षा देण्याबाबतही बोलले आहे.
हेही वाचा: Air India Scorpion : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिलेला चावला विंचू