Aakhad Party: श्रावण येण्यापूर्वी आखाड जोरात, मटण खरेदीसाठी नागरिकांच्या पहाटेपासून दुकानाबाहेर लांबलचक रांगा! - Aakhad Party 2023
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16-07-2023/640-480-19011688-thumbnail-16x9-pune-update.jpg)
पुणे : आज आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार आहे. आजच्या आखाड पार्टीसाठी पुणेकरांनी मटण खरेदी करण्यासाठा मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील नवी पेठ येथील सोनाली मटण शॉपी येथे पहाटेपासूनच मटण खरेदीला गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. सकाळपासून जवळपास 2 टनहून अधिक मटण विक्रीला गेले आहे. नागरिक पहाटे 5 वाजल्यापासून मटण खरेदीसाठी गर्दी करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून आखाड पार्टी हा इव्हेंट झाला आहे. कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन मटण पार्टी केली जाते. यंदाही आज आखाड महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने अनेक ठिकाणी आज आखाड पार्टी जोरात होते. नागरिक मोठ्या प्रमाणावर मटणाला अनेक पसंती देत आहे. नागरिक येथे तासनतास उभे राहून मटण खरेदी आहे.