भिवंडीतील फर्निचर गोदामाला भीषण आग, सुदैवाना जीवित हानी नाही - जब्बार कंपाउंड
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडवची घटना समोर आली आहे. शहरातील जब्बार कंपाउंड परिसरात एका फर्निचर गोदामाला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भिवंडी शहरातील जब्बार कंपाउंड परिसरात फर्निचरचे गोदाम आहे. या गोदामात लग्नासाठी लागणारे फर्निचर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. मंगळवारी (दि. 31 मे) सायंकाळच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली त्यावेळी गोदामाचे छत उडाले. हिीआग काही क्षणातच सर्वत्र गोदामात पसरल्याने या आगीमध्ये फर्निचर मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे. काही प्रमाणात फर्निचर वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. आगीची माहिती मिळताच या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. या भीषणवर तब्बल दोन तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नसून आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST