Snake Cobra Viral Video : मुंगसाच्या तावडीतून सुटला अन्... बाळाच्या झोळीत नाग घुसला, पहा व्हिडिओ - नागाच्या मागे मुंगूस
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : नाग दिसला तर चांगल्या चांगल्यांची पाचावर धारण बसते. असाच थरकाप उडविणारा नागाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शेताजवळील घराच्या बाहेर नागाच्या मागे मुंगूस लागल्याचे दिसते. या मुगसाला घाबरून हा सहा ते सात फूट लांब काळ्या रंगाचा नाग थेट घराच्या बाहेर असलेल्या बाळाच्या झोळीवर चढताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक दुचाकी दिसून येत आहे. त्याचा नंबर एमएच 15 म्हणजे नाशिक पासिंगची ही दुचाकी असून, यावरून हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजते. मात्र अद्याप हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला हे समजले नाही. सध्या उष्णता वाढली असून साप बिळाच्या बाहेर येत आहेत. तसेच शेतातील घर किंवा शेतात काम करताना सर्प दंशाच्या घटना देखील घडत आहेत. त्यात विषारी सापाने दंश केल्यावर अनेक मृत्यू देखील झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील दक्षता बाळगावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.