Passengers Survived बर्निंग बसचा थरार; 13 प्रवासी थोडक्यात बचावले - रस्त्याच्या बाजूला बस पलटी
🎬 Watch Now: Feature Video
Passengers Survived रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे बर्निंग बसचा थरार गुरुवारी संध्याकाळी पहायला मिळाला आहे. कर्नाटक डेपोची बस रत्नागिरीकडे येत होती. यावेळी रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील साखरपा जाधववाडी येथे रस्त्याच्या बाजूला बस पलटी होऊन बसने पेट घेतला.यावेळी गाडीत 13 जण होते. मात्र गाडीतील प्रवाशी वेळीच स्थानिकांनी बाहेर काढल्याने अनर्थ टळला. मात्र काहीजण यामध्ये जखमी झाले आहे. संध्याकाळी 4 च्या सुमारास अपघात झाला आहे. दरम्यान रस्ता सोडून गाडी पुलाच्या खाली पलटी झाल्याने व डिझेल टाकी पेटल्याने ही घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासन मदतीला धावून गेले. जखमींना तातडीने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या 2 रुग्णवाहिकेतून साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अधिक तपास साखरपा पोलीस करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST