Pune Mumbai Railway : आता पुणे-मुंबई रेल्वेचे जनरल डब्बे सुरू होणार - रेल्वेचे जनरल डब्बे सुरू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14776925-thumbnail-3x2-train.jpg)
पुणे - कोरोनाचा उद्रेक आता कमी होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने (Indian Railway) देखील आता निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा एक भाग म्हणून बंद असलेले जनरल रेल्वे सेवा (Indian Railway General) आता सुरू करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई येथे रोज ये-जा करणारे प्रवासी अधिक आहेत. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने या मार्गावरील जनरल डब्बे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले असेच प्रवासी रेल्वेमधून प्रवास करून शकणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST