MBBS Student Stuck in Kiev : युक्रेनच्या कीव शहरात अडकली अकोल्यातील एमबीबीएस विद्यार्थीनी; होस्टेलच्या तळघरात आहे सुरक्षित - student stranded hostel bunker in Kiev
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - रशिया युक्रेन युद्धाची ( Russia Ukraine War ) झळ विदेशातील नागरिकांना पडत आहे. भारतातील हजारो विद्यार्थी या युक्रेनमध्ये अडकलेले ( Indian Student Stranded in Ukraine ) आहेत. अकोल्यातील ही चार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील एक एमबीबीएसची विद्यार्थीनी युक्रेनच्या राजधानी कीव शहरात ( MBBS Student Stuck in Kiev ) अडकली आहे. ती ज्या होस्टेलमध्ये राहत होती. त्या होस्टेलच्या तळघरात सध्या सुरक्षित आहे. तिच्यासोबत दुसऱ्या देशातील विद्यार्थी सुरक्षित आहेत. भारत देशातील 200 विद्यार्थी तिथे असल्याचे प्राप्ती भालेराव हिने सांगितले आहे. अकोला जिल्ह्यातील चार विद्यार्थी तिथे आहेत. त्यापैकी तेल्हारा तालुक्यातील प्राप्ती भालेराव ही विद्यार्थिनी युक्रेन राजधानी कीव शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. परंतु, रशियाने युद्ध केल्यामुळे ती सध्या त्या शहरात अडकलेली आहे. ती ज्या ठिकाणी राहत होती, त्या होस्टेलच्या तळघरात ती राहत आहेत. सध्या ती सुरक्षित आहे. मात्र, रशियाने कीव शहरावर सर्वात आधी हल्ला केला होता. याच शहरात ही प्राप्ती भालेराव राहत आहे. सध्या ती जीव मुठीत घेऊन या शहरातील होस्टेलच्या तळघरात राहत आहे. ती व तिच्या सोबत देशातील 200 पेक्षा जास्त विद्यार्थी व इतर देशातील विद्यार्थी त्या तळघरात वास्तव्यास आहे. एकमेकांना मदत करीत हे विद्यार्थी शांततेत याठिकाणी बसलेले आहेत. त्यांना अनेक अडचणींचा त्याठिकाणी सामना करावा लागत आहे. ती मायदेशी परत येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, युद्ध सुरू असल्यामुळे विमानसेवा विस्कळित झाली आहे. परिणामी, तिच्या सोबतच अनेक विदेशातील विद्यार्थी 'त्या' ठिकाणी अडकलेले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST