नारळ काढण्यासाठी झाडावर चढला आणि वरच अडकला; खाली काढण्यासाठी बोलावे लागले जवानांना, पाहा Video - पुणे लाईव्ह न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुण्यातील नेताजी नगर वानवडी येथील एका बिल्डींग नंबर 21 याठिकाणी नारळाच्या झाडावर नारळ काढण्यासाठी एक जण चढला होता. त्याने लावलेली सीडी पडली आणि त्यांनंतर सुजित ज्ञानदेव थोरात हे झाडावरच अडकले ( man stuck on coconut tree in pune ) आणि त्यांनतर अग्निशमन दलातील जवानांना बोलावे लागले. एक तासानंतर त्या युवकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुजित ज्ञानदेव थोरात हे नारळ काढण्यासाठी झाडावरती चढले होते. नारळ काढून उतरताना त्यांनी वापरलेले स्टॅन्ड अचानक घसरू लागल्याने थोरात हे घाबरलेल्या अवस्थेत अंदाजे 40 ते 45 फुट उंचीवर ते साधारण अर्धा ते पाऊण तास अडकून बसलेली होते. त्यांनंतर याबाबत अग्निशमन दलाच्या जवानाला कॉल मिळताच जवानांनी एक्सटेंशन लेडर व रस्सीच्या साह्याने नारळाच्या झाडाला रस्सी बांधून थोरात यांची सुखरूप सुटका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST