VIDEO : बछड्यांना अलगद जबड्यात धरुन हलविले सुरक्षितस्थळी; पाहा, बिबट मादीचा 'तो' मायाळूक्षण

By

Published : Mar 2, 2022, 4:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail
नाशिक - त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी येथील नाशिक वन हद्दीतील तळवाडे येथे बंडू आहेर यांच्या शेतात मंगळवारी (दि.1) ऊस तोडणी सुरु हाेती. त्याचवेळी उसताेड मजूरांसह मुकादमाला बिबट्याचे 3 ते 4 दिवसांपूर्वी जन्मलेले तीन बछडे दिसून आले. त्यांनी ही घटना वनविभागाला कळविली. त्यानुसार वनविभागाचे आधिकारी व पथक घटनास्थळी पाेहाेचले. त्यांना या बछड्यांची मादी दिसून आली नाही. बछडे नुकतेच जन्माला आले असल्याने त्यांची आईपासून ताटातूट हाेऊ नये म्हणूण पथकाने उपाययाेजना सुरु केल्या. त्यानुसार पथकाने बछड्यांजवळ काेणतीही हालचाल न करता ट्रॅप केमेरे तैनात करुन लक्ष ठेवले. त्याचवेळी मध्यरात्री बिबट मादीने या तिन्ही बछड्यांना अलगद जबड्यात धरुन दुसऱ्या सुरक्षितस्थळी घेऊन ( leopard move the calf to a safe place ) गेली. रात्री उशिरापर्यंत एक-एक करून मादीने आळीपाळीने तीनही बछड्यांना उसाच्या फडापासून लांब अंतरावर नेले. हा त्या आक्रमक प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिबट मादीचा मायाळूक्षण पाहायला मिळाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.