VIDEO : 'आत्ताच्या पिढीच्या गोष्टी बदलल्या' - जावेद अख्तर - javed akhtar in pune 2022
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - आत्ताच्या पिढीच्या गोष्टी बदलल्या, त्यांना प्रश्न पडू लागले की आम्ही कोण आहोत. जिज्ञासा त्यांना पुढे घेऊन गेली. या पिढीचे सामाजिक भान खूप चांगले आहे. आता बदलत्या वेळेप्रमाणे चित्रपट अधिक चांगले होत आहेत. मला भविष्याकडून आशा आहे.' असे मत गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Piff 2022) महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जावेद अख्तर यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. तसेच बदलता चित्रपट या विषयावर बोलताना अख्तर म्हणाले, की '५० च्या दशकातील नायक हा कामगार वर्गातून येणारा होता. मात्र, ९० च्या दशकात नायक हा कामगार वर्गातील नव्हता. आता पुन्हा गोष्टी बदलत आहे. छोट्या गावांतून चित्रपट येत आहेत, असेही ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST