VIDEO : पाहा, तालिबानविषयी प्रश्न विचारताच कसे पळाले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान - ani
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12477632-thumbnail-3x2-imran.jpg)
ताश्कंद : तालिबानवर नियंत्रण मिळविण्यात पाकिस्तानला अपयश येत आहे का? असा प्रश्न एएनआयच्या प्रतिनिधीने विचारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अक्षरश: पळ काढल्याचे चित्र उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये बघायला मिळाले. मध्य-दक्षिण आशिया परिषदेसाठी इम्रान खान ताश्कंदमध्ये आले होते. यावेळी एएनआयच्या पत्रकाराने त्यांना दहशतवाद आणि चर्चा हे दोन्ही एकाच वेळी कसे शक्य आहे? असा प्रश्न विचारला असता आम्ही भारतासोबत चांगल्या संबंधांसाठी इच्छुक आहोत, मात्र आरएसएसची विचारसरणी आड येत आहे असे ते म्हणाले. यानंतर पत्रकाराने तालिबानवर नियंत्रण मिळविण्यात पाकिस्तानला अपयश येत आहे का? असा प्रश्न विचारल्यावर याचे उत्तर न देता इम्रान खान यांनी तेथून काढता पाय घेतला.
Last Updated : Aug 4, 2021, 12:54 PM IST