VIDEO : आफ्रिकन स्थलांतरित नागरिकांची बोट उलटून सात जणांचा मृत्यू - स्थलांतरित नागरिक बातमी
🎬 Watch Now: Feature Video
ओरझाला - स्पेनच्या मालकीच्या कॅनरी बेटांजवळ आफ्रिकन स्थलांतरित नागरिकांना घेवून जाणारी बोट उलटली. या अपघातात सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बोटीत सुमारे ३० नागरिक होते. मात्र, एका महाकाय दगडाला बोट धडकल्याने उलटली. अनेक आफ्रिकन देशातील नागरिक स्पेनमध्ये आणि जवळील बेटांवर स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, या प्रयत्नात अनेकांचा जीव जातो. बोट उलटल्यानंतर बचावाकार्य करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.