ब्लॅक लाईव्ज मॅटर! वर्णभेदाविरोधात पुन्हा एक क्रांती... - अमेरिका आंदोलन विशेष
🎬 Watch Now: Feature Video
वॉशिंग्टन - "ब्लॅक लाईव्ज मॅटर"... २०१४ नंतर हे वाक्य पुन्हा अमेरिकेच्या रस्त्यांवर गरजू लागले आहे. याला कारणीभूत आहे, तो जॉर्ज फ्लॉईड या व्यक्तीचा मृत्यू! जॉर्जला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जवं करत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका" असं जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला! या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्या पोलिसाच्या आणि देशातील एकूणच वर्णभेदाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, आणि एका मोठ्या आंदोलनाला सुरूवात झाली....