Maharashtra Budget 2022 : शेतकरी, छोट्या उद्योजकांना न्याय देणारा अर्थसंकल्प : नाना पटोले - महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२२
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राज्य सरकारचा आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण बजेट आहे. सर्वसामान्य माणसावर कोणताही कर न लावता राज्य सरकारने हे बजेट सादर केले. शेतकऱ्यांना आणि छोट्या उद्योजकांना न्याय देणार बजेट आहे. कोविड काळ आपण सर्वांनी पाहिलेला आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. सर्व स्तराला न्याय देण्याचे काम अर्थसंकल्पातून झाले असून, महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्यासाठी देखील या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. या बजेटमुळे भाजपाची राजकीय पोळी भाजली जाणार नाही म्हणून, ते या बजेटला विरोध करत असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश कारंजकर यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST