Holi Celebration Mumbai : मुंबईत कोरोनानंतर रंगपंचमी उत्साहात साजरी - होळी स्पेशल न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव, आनंदाचा उत्सव ,सर्जनशीलतेचा उत्सव. हा उत्सव आज मुंबईतील प्रत्येक रहिवासी सोसायटीमध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला व कोरोनानंतरची पहिली रंगपंचमी असल्याने सर्वत्र उत्साह पाहायला ( Holi Celebration Mumbai ) मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून मुंबईसह देशभरात कोरोना महामारीने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आणि सणांवर संकट आले होते. यावर्षी कोरोना महामारीचे संकट काही प्रमाणात नाहीसे झाल्याने मुंबईत सर्वत्र उत्साह पाहायला मिळतो आहे. त्यातच कोरोना महामारी नंतर आलेला पहिला सण म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमी हा रंगांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्याने सर्व आबालवृद्धांनी या उत्सवात सकाळपासूनच सहभागी होऊन रंगांची मनसोक्तपणे उधळण केलेली सर्वत्र पाहायला मिळते आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST