Newborn Girl Helicopter Ride Khed : मुलगी जन्माचा असाही उत्सव, नवजात परीला थेट हेलिकॉप्टरमधून आणलं घरी - नवजात मुलीची हेलिकॉप्टर सफर
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात काही वर्षांपूर्वी मुलगा हवा या अट्टाहासापोटी मुलींची गर्भातच किंवा जन्मताच हत्या करण्याचे प्रमाण प्रचंड होते. मात्र, अलीकडे ही परिस्थिती बदलत असून, मुलींच्या जन्माचा स्वागत मोठ्या उत्साहात केला जात आहे. अशाच एका मुलीच्या जन्माचा सोहळा खेड ( Girl Birth Ceremony Khed ) येथील शेलपिंपळगांव येथे झाला आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे गुढीपाडव्याच्या दिवशी मुलीचा जन्म झाला. विशाल झरेकर ( Vishal Jharekar ) यांनी आपल्या चिमूकलीचं स्वागत चक्क हेलिकॉप्टरमधून ( Welcome the girl traveling by helicopter ) घरी आणत व्यक्त केले. नवजात मुलीला हेलिकॉप्टरमधून आणून, मुलीचा जन्म एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करावा. हाच संदेश मला समाजाला द्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया विशाल झरेकर यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST