Gudi Padwa Shobha Yatra 2022 : ठाण्यात दोन वर्षांनी निघाली शोभायात्रा; विज्ञान आणि परंपरा थीमला नागरिकांचा प्रतिसाद

By

Published : Apr 2, 2022, 7:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

thumbnail
ठाणे - गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी ठाणे शहरात कोपीनेश्वर मंदिराच्या पालखीची शोभायात्रा काढण्याचा रिवाज गेले ( Gudi Padwa Shobha Yatra 2022 ) अनेक वर्षे ठाण्यात पाळला जात आहे. परंतु, गेली दोन वर्षं कोरोनाच्या सावटामुळे या शोभायात्रेत खंड पडला होता. मात्र, राज्य सरकारने आता सर्व निर्बंध हटवले आहे. त्यानंतर आज ठाण्यातील बाग मुख्य बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती. त्याचप्रमाणे ठाण्यातील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिर देखील भक्तीने आणि चैतन्याचे वातावरण तयार झाले होते. कोपिनेश्वरची पालखी घेऊन शोभायात्रा निघाली असून, शोभायात्रेत प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक सहभागी झाले होते. तसेच, या शोभायात्रेत विज्ञान आणि परंपरा थीम असलेले 50 हून अधिक ग्रंथ सामील झाले होते. तर, महिलांनी नऊवारी साड्या नेसून व डोक्यावर फेटा बांधून बाईक रॅली काढली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.