Food Video: पेपर अॅण्ड बेकन सॅंडविच; झटपट तयार होणारे व खायलाही चविष्ट... - बेकन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15991914-thumbnail-3x2-sandvich.jpg)
आज 'फुड व्हीडीओ' (Food Video) मध्ये आपण तयार करणार आहोत, 'पेपर अॅण्ड बेकन सॅंडविच'. पावसाळ्यात सतत चविष्ट व गरमागरम (Tasty and hot) असे काहीतरी खाण्याची ईच्छा होत असते. तेव्हा आपण 'पेपर अॅण्ड बेकन सॅंडविच' हा पदार्थ नक्की ट्राय करुन बघा. यामुळे तुमची चविष्ट खाण्याची ईच्छा पुर्ण होईलच. शिवाय तुमचे पोटही भरल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल. चला तर मग बनवुया 'पेपर अॅण्ड बेकन सॅंडविच'. यासाठी लागणारे साहीत्य पुढील प्रमाणे आहे.
1. दोन हीरव्या पिवळ्या शिमला मिर्ची (capsicum)
2. 1 चमचा तेल (Oil)
3. बेकन (Bacon) च्या 8 ते 10 स्ट्रिप्स
4. पनीर (Paneer) व चीज (Cheese)
'पेपर अॅण्ड बेकन सॅंडविच' तयार करण्याची सोपी पध्दत :
हीरव्या पिवळ्या शिमला मिर्चीच्या (capsicum)बिया काढुन तिला बारीक कापा. त्यानंतर कढई मध्ये 1 चमचा तेल (Oil) टाका. त्यात बेकनच्या (Bacon) 8 ते 10 स्ट्रिप्स फ्राय करा. चार ब्रेड तव्यावर दोन चमच्च क्रीम-चीज लावुन भाजुन घ्या. त्यानंतर त्यावर किसलेले पनीर (Paneer) व बारीक चीरलेली शिमला मिर्ची टाका. त्यावर बेकन स्ट्रिप्स ठेवा. त्यावर परत पनीर व चीज (Cheese) किसुन टाका. परत ब्रेडच्या स्लाईस वरुन ठेवा. आणि त्याला त्रिकोणी आकारात कापा. झाले तुमचे पेपर अॅण्ड बेकन सॅंडविच तयार.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST