शरीरासाठी गुणकारी गूळ आणि लिंबूचे सरबत - रेसीपी
🎬 Watch Now: Feature Video

लिंबू हा आपल्या जेवणासोबत रोज असतेच. काहींना ते आंबट असल्यामुळे आवडत नाही. मात्र, लिंबूमध्ये क जीवनसत्व असल्याने ते शरीरासाठी उत्तम आहे. लिंबू पचनासंबंधीत अडचणी असल्याच त्या दूर करण्यात मदत करते. तर गुळदेखील पोटाचे सगळे विकार दूर करण्यासाठी गुणकारी आहे. गुळामधील लोह आणि कॅल्शिअममुळे स्नायू आणि सांध्याचे दुखणे दूर होण्यास मदत होते. तर आजचे आमचे हे खास पेय गुळ आणि लिंबू या दोन्हीच्या मिश्रणातून बनविण्यात आले आहे. गुळ आणि लिंबुचे सरबत बनवायला अगदी सोपे आहे. गुळ आणि लिंबूचे हे सरबत एकदा नक्की ट्राय करा.