Gokul Pethe Recipe Video : साखरेच्या पाकात बनवलेले गोकूळ पेठे; पाहा रेसिपी - Golden Fry

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 24, 2022, 4:40 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

गोकूळ पेठे ( Gokul Pethe ) तयार करण्यासाठी सुरूवातील साखरेचा पाक तयार करावा. त्यासाठी गॅसवर एक भांडे ठेऊन, त्यात 2 वाटी साखर 1 वाटी पाणी घ्यावे. साखर ( Suger ) विरघळून द्यावी त्यानंतर त्यात वेलदोडे टाकावेत. चांगला पाक तयार करून घ्यावा. फिलींग तयार करण्यासाठी दोन चमचे तूप ( Ghee ) पॅनमध्ये गरम करावे. तूप गरम झाल्यानंतर त्यात अर्धावाटी साखर, ताजे खीसलेले खोबरे ( Coconuts ) 1 वाटी, 2 वाटी खवा, मिश्रण एकजीव होईपर्यंत सतत हलवत रहावे. मिश्रण थंड होईपर्यंत थांबावे. त्यानंतर लिंबाच्या आकाराचे गोळे करावे. त्यानंतर दिड वाटी मैदा घेऊन. त्यात चिमूटभर बेकिंग सोडा ( Baking Soda ) टाकून जाडसर बॅटर तयार करावे. पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात कोकोनट कॅक बॅटरमध्ये डिप करावे. त्यानंतर सोनेरी होईपर्यंत फ्राय ( Golden Fry )करा. त्यानंतर काही तासांसाठी गोळे पाकात ठेवावेत. तुमचे गोकूळ पेठे खाण्यासाठी तयार.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.