First Bitcoin Fraud Scam : देशातील पहिला बिटकॉइन फसवणूक घोटाळा; तपास एसआयटीकडे देण्याची तक्रारदारांची मागणी - माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14869988-thumbnail-3x2-pune.jpg)
पुणे:- देशातील पहिला बिटकॉइन फसवणूक घोटाळा पुण्यात घडला. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तांत्रिक विश्लेषकाची मदत घेतली. मात्र तांत्रिक विश्लेषक म्हणून काम करणाऱ्या पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनीच तपासाच्या नावाखाली आरोपीकडून जप्त करण्यात आलेले बिटकॉइन स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. हे चोरी उघड झाल्यानांतर या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील सर्व तक्रारदार हे एकत्र आले असून देशातील पहिला बिटकॉइन फसवणूक प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण 2017 पासून असून यात पुणे शहरातील विविध तक्रारदारांकडून तब्बल 2500 हुन अधिक बिटकॉइन बाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे. या तक्रारदारांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST