Video : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग; साहित्य जळून खाक - कंपनीला आग
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - वाळूज परिसरातील एलएपीएल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील यंत्र व साहित्य भस्मसात झाले. दरम्यान ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चार बंबांनी तीन तासांपेक्षा अधिक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. एलएपीएल (प्लॉट नं.एल. १८/१५) कंपनीत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनाच्या लाईट इंडिकेटरचे उत्पादन करण्यात येते. कंपनीत जवळपास १०० जण काम करतात अशी माहिती कंपनीने दिली. कामगार काम करत असताना कंपनीच्या पेंटशॉपला अचानक आग लागून धुराचे व आगीचे लोळ उठले.ही बाब लक्षात येण्याअगोदर प्लॅस्टिकच्या मटेरियलने पेट घेतल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST