'तुम्ही भारतीय सिनेमा समृद्ध केला' म्हणत मोहनलालने दिल्या बिग बींना शुभेच्छा - बिग बी ८० वा वाढदिवस
🎬 Watch Now: Feature Video
अमिताभ बच्चन यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच थरातून त्यांच्यावर शुभेच्छांवर्षाव सुरू आहे. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी बिग बी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मोहनलाल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलंय की, "आपल्या संपूर्ण देशात भावनांचा ओघ निर्माण करणारे नाव म्हणजे अमिताभ बच्चन सर. तुमच्यासोबत स्क्रिन स्पेस शेअर करण्याचा संधी मला मिळाली. तुम्ही नेहमीच आमचे प्रेरणास्थान आहात. तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो." अमिताभ आणि मोहनलाल यांनी २००७ मध्ये राम गोपाल वर्माच्या आग आणि २०१० मध्ये रिलीज झालेल्या मल्यामळ चित्रपट कंधारमध्ये एकत्र काम केले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST