एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर 'फायटर'च्या रिलीजपूर्वी दीपिका पदुकोणने घेतले तिरुपती बालाजीचं दर्शन - Deepika Padukones visit to Tirupati

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 11:30 AM IST

Updated : Dec 15, 2023, 12:05 PM IST

तिरुपती (आंध्र प्रदेश) - Deepika Padukones visit to Tirupati :  दीपिका पदुकोण तिच्या आगामी एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर 'फायटर'च्या रिलीजची तयारी करत असून, ती गुरुवारी संध्याकाळी तिरुमला येथे तिची बहीण अनिशासह भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती. दीपिका आणि तिची बहीण अनिशासोबत आगमन झाल्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. या भेटीसाठी, दीपिकाने हस्तिदंती सलवार सूट घातला होता आणि बनमध्ये तिचे केस स्टाईल केले होते.

शुक्रवारी सकाळी दीपिकाने श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना केली. तिरुपतीच्या बालाजीला विष्णूचा अवतार मानला जातो, जो कलियुगातील आव्हानांपासून मानवतेला मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला होता. मंदिराला कलियुग वैकुंठ म्हणूनही ओळखले जाते.  

दरम्यान, दीपिकाचा आगामी चित्रपट 'फायटर' हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यात तिची जोडी हृतिक रोशनसोबत असणार आहे. या चित्रपटात ती भरपूर अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. यासोबतच दीपिका पदुकोण आगामी 'कल्की 2898 एडी' या साय-फाय अ‍ॅक्शन चित्रपटात प्रभाससोबत देखील काम करणार आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये 'द इंटर्न' हा अमिताभ बच्चनसोबत आणि रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटांचाही समावेश आहे.

हेही वाचा -

  1.  'लुट पुट गया' गाण्यावर थिरकला ख्रिस गिल, शाहरुख खाननं केलं त्याच्या कोरिओग्राफीचं कौतुक
  2.  शुटिंगनंतर श्रेयस तळपदेला उच्च रक्तदाबाचा त्रास, रुग्णालयात उपचार सुरू
  3.  भारती सिंह, हर्ष लिंबाचिया आणि ढिंचक पूजा 'बिग बॉस 17'च्या वीकेंड का वारमध्ये लावणार हजेरी
Last Updated : Dec 15, 2023, 12:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.