First Day of School: पुणे तिथे काय उणे! पुणेरी पाट्या लावत मुलीला सोडले शाळेत - पुणे तिथे काय उणे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : विदर्भ वगळता आजपासून राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली. ठिकठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुले मुली हे रडताना पाहायला मिळाले. पुण्यात तर पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. याची प्रचिती ही नेहमीच विविध माध्यमातून येत असते. असे असले तरी आज शाळेच्या पहिल्याच दिवशी साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष पियूष शाह यांनी आपल्या मुलीला बग्गीमध्ये बसवून शाळेत सोडले आहे. विशेष म्हणजे या बग्गीला सजवून पुणेरी पाट्या लावण्यात आल्या होत्या. दरवर्षी राज्यातील शाळा या 13 जून रोजी सुरु होत असताना, मात्र यावर्षी राज्यातील शाळा या 15 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल होता. आजपासून राज्यातील शाळा सुरु होणार असल्या तरी विदर्भातील शाळा आजपासून सुरु झाल्या नाहीत. विदर्भातील शाळा या येत्या 30 जूनपासून सुरू होणार आहेत.