Aashadhi Wari 2023 : दिवे घाटात घुमला विठुमाऊलीचा गजर; पहा ड्रोन व्हिडिओ - Drone visuals of Deve Ghat

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 14, 2023, 9:52 PM IST

Updated : Jun 14, 2023, 10:48 PM IST

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज पुण्यातून प्रस्थान झाले आहे. आज माउलींच्या पालखीने टाळ मृदुंगावर ठेका धरत सगळ्या महत्वाचा तसेच कठीण टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवे घाटचा टप्पा पार केला आहे. वारकऱ्यांनी भर ऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला आहे. लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विहंगम दृष्य पाहायला मिळाले. दिवेघाट पार करणे म्हणजे सगळ्यात मोठी अवघड वाट असल्याचे वारकरी सांगत असतात. पालखी सोहळ्यामध्ये आज खासदार सुप्रिया सुळे यादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वारकऱ्यासोबत झेंडेवाडीपर्यंत पायी वारी सुद्धा केली आहे. विठ्ठलाकडे एवढेच मागणे की, यावर्षी पाऊस कमी आहे, पाऊस पडू दे. अडचणीत असलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, हे साकडे सुप्रिया सुळे यांनी विठ्ठलाला घालते आहे. 

Last Updated : Jun 14, 2023, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.