छगन भुजबळांच्या भाषणावरून संभाजीराजे संतापले; शाहू, फुले विचारांचा वारसदार म्हणाल्याचा झाला पश्चाताप - Manoj Jarange
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 18, 2023, 4:46 PM IST
पुणे Chhatrapati Sambhaji Raje On Chhagan Bhujbal : ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या भाषणावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीय. शुक्रवारी अंबड येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यातील भुजबळांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. छगन भुजबळ यांचं भाषण ऐकून काही दिवसापूर्वी जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांचा अभ्यास पाहून शाहू, फुले, आंबेडकर विचाराचा वारसदार म्हटलो होतो. त्याचा आता मला स्वतःला पश्चाताप होत असून, एका मंत्र्यांची बोलण्याची पातळी अशा पद्धतीने खालवली याचं आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया, संभाजीराजे यांनी दिली आहे. तर मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यात मंत्री छगन भुजबळ मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या वादामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण होत आहे. परंतु राज्यात शांतता राहिली पाहिजे आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका असल्याचं मत, छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात व्यक्त केलं आहे.