Development works in Worli : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वरळीतील विकासकामांची पाहणी - अजित पवारांनी आदित्य ठाकरेंंचे कौतुक केले

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 11, 2022, 10:09 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

मुंबई: वरळी विधानसभा मतदार संघातील (Worli Assembly constituency) विविध विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज पाहणी केली आहे. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) हे देखील उपस्थित होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य केले. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी वरळीत विकासकामांचा धडाका (Development work in Worli) सुरू केला आहे. मुंबई: वरळी विधानसभा मतदार संघातील (Worli Assembly constituency) विविध विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज पाहणी केली आहे. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) हे देखील उपस्थित होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य केले. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी वरळीत विकासकामांचा धडाका (Development work in Worli) सुरू केला आहे. नुकतेच दादर चैत्यभूमी येथे पर्यटकांसाठी पर्यटन गॅलरी (Tourism Gallery at Chaityabhoomi) उभारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामांचा आज आढावा घेतला. धोबीघाट, वरळी आणि दादर येथील चैत्यभूमीवरील नव्या गॅलरीची पाहणी केली. वरळीतील विकास कामे आणि सौंदर्यीकरणावर आदित्य ठाकरे यांनी दिलेला भर, याबाबत अजित पवारांकडून तोंडभरून कौतुक (Ajit Pawar praised Aditya Thackeray) करण्यात आले. दरम्यान आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या युतीबाबत चर्चा झाल्याचे समजते.अचानक ठरलेल्या या कार्यक्रमामुळे राज्य शासन आणि मनपाचे अधिकारी अनभिज्ञ होते. मात्र उपमुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री सोबत येत असल्याचे समजताच अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अखेर धावपळ करत वरळी विधानसभा क्षेत्र गाठले. काही दिवसांपूर्वी पुण्यात कोरोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीआधी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, "नागरिकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरू केलीय. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील." या त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले ते वक्तव्य मागे घेतले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.