गुर्‍हाळघरावर काम करणार्‍या कातकरी महिलांचा नृत्याविष्कार, पाहा व्हिडिओ - कराड गुऱहाळघर कातकरी महिला नृत्य

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 11, 2022, 5:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

कराड (सातारा) - खडतर जीवन जगत असताना संगीतमय नृत्यांमधून आपल्या जीवनात आनंद निर्माण करणारे कातकरी लोक उत्स्फुर्त समाज जीवनाचे दर्शन देखील घडवतात. बांबू, भोपळे, मातीच्या भांड्यापासून घडवलेली म्हणजे फाकवलेल्या, खुळखुळणार्‍या बांबूच्या काड्या, प्रतिध्वनीसाठी जोडलेले दोन भोपळे, डेरा, थाळी, घुंगरू, ही वैशिश्ट्यपूर्ण आणि प्रभावी नाद निर्माण करणारी वाद्ये कुशलतेने वाजवितात. सहज सोपी आणि कोणालाही ठेका धरायला लावणारी ही नृत्य परंपरा कातकरी, आदिवासींनी आजही जपली आहे. पदन्यास, हालचाली आणि शब्दोच्चाराचा मेळ जमवून कातकरी आपले समूह नृत्य सादर करतात. रायगड जिल्ह्यातून मजुरीसाठी कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड परिसरात आलेले कातकरी गुऱ्हाळघरावर (Gurhal Ghar at karad) काम करत होते. रामनवमी दिवशी गुर्‍हाळघर बंद झाल्यानंतर कातकरी महिलांनी (Katkari women Dance) प्लॅस्टिक कॅन आणि थाळ्यांसारख्या साध्या वाद्यांवर ठेका धरत सामूहिक नृत्य सादर करून आनंद साजरा केला. पाहा व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.