VIDEO : चालू कीर्तनात ताजुद्दीन महाराजांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन - नंदुरबारमध्ये चालू कीर्तनात महाराजांचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
जालना - हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले ताजुद्दीन महाराजांना कीर्तन करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. ही घटना काल रात्री नंदुरबार येथे घडली. ताजुद्दीन महाराज हे घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथील रहिवासी होते. त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांचे मंदिर उभे केले होते. ताजुद्दीन महाराजांचे नंदुरबारमध्ये कीर्तन सुरू होते. त्यांच्या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते व्यासपीठावर बसले. कीर्तन काही जण आपल्या मोबाइलमध्ये हे शूट करत होते. त्याचवेळी ताजुद्दीन महाराजांना ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. हिंदू-मुस्लिम धर्मातील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने केली. त्यांचा जन्म औरंगाबादमधील सातारा भागात झाला होता. त्यांनी काही काळ पुणे येथे जाऊन कंपनीमध्ये काम ही केले होते. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागला.