वाढदिवस भावाचा, जल्लोष गावाचा : 550 केक कापून बर्थ डे बॉयने दाखवला जलवा - वाढदिवसाला 550 केक कापणारा तरुण
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वाढदिवसाला केक कापण्याची प्रथा अलिकडे देशभर पसरली आहे. अशा प्रसंगी केक कापण्याच्या असंख्य तऱ्हा आपण आजवर पाहिल्या आहेत. पण मुंबईतील कांदिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने एकाच वेळी 550 केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. 550 केक एकत्र कापणाऱ्या व्यक्तीचे नाव सूर्या रतुरी आहे. सुर्या रतुरी या बर्थडे बॉयने कापलेल्या केकचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. आपण समाजसेवक असून लोकांचे आपल्यावर उदंड प्रेम असल्याचे सूर्या यांनी सांगितले.
बर्थडे आहे भावाचा जल्लोष आहे जल्लोष साऱ्या गावाचा सध्याच्या जगात कोण काय करेल याचा काहीही नेम नसतो. मुंबईच्या कांदिवली येथे एक-दोन नाही तर तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 550 केक कापण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूर्या रतुरी हे नरसिंग स्वराज रक्षक नावाच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. सूर्या रतुरीने सांगितले की काल त्याचा वाढदिवस होता, आणि मुंबईच्या विविध भागांतील लोक स्वतः केक घेऊन आले होते. सूर्याला एवढे केक एकत्र येतील हे देखील माहित नव्हते.
सूर्याने सांगितले की केक कापण्यापूर्वी त्यांनी 200 दिव्यांगांना अन्नधान्य वाटप केले होते आणि जो केक कापला गेला होता तो गरजू लोकांमध्ये वाटला गेला.