Sharad Pawar 81 Birthday : शरद पवार यांना अंध कलाकाराकडून अनोख्या शुभेच्छा

By

Published : Dec 12, 2021, 5:33 PM IST

thumbnail
पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राज्यभरात 81 वाढदिवस (Sharad Pawar 81 Birthday) मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. बार्शी येथील अंध कलाकार महेश मस्के यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी नारळाच्या पानावरती (Sharad Pawar on Coconut Tree) खासदार शरद पवार यांची प्रतिमा साकारली आहे. शरद पवार यांना अशा प्रकारे आगळ्यावेगळ्या पद्धतीने महेश मस्के यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. बार्शी तालुक्यातील जामगाव येथील अंध कलाकार महेश मस्के यांनी कलाकृतीतून शरद पवार यांना वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा दिल्या. महेश मस्के यांनी नारळाच्या पानावरती शरद पवार यांची प्रतिमा साकार केली. बार्शी तालुक्यातील कलाकार महेश मस्के आपल्या आगळ्यावेगळ्या कलाकृतीमुळे प्रसिद्ध आहेत. शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त साधून महेश मस्के यांनी नारळाच्या पानावरती चार तासांची मेहनत घेतली. यामध्ये कटर व चिकट टेप अशा वस्तूंचा वापर करून शरद पवार यांच्यासारखी प्रतिमा साकारण्याचे काम महेश मस्के यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.