ही महाराष्ट्राची परंपरा नाही, जनता जनार्दन कौल देईल - दादा भुसे - shivsena
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नारायण राणेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राची ही परंपरा नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र हे सहन करत नाही. त्यांना कोणी अनुमोदन देत असेल, भाजप त्याचे समर्थन करत असेल तर राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. जनता जनार्दनाचा कौल महत्वाचा असतो असे दादा भुसे यांनी म्हटले आहे. स्वतः गाडीतून फिरायचं अन् जनतेला गर्दीत लोटून कोरोना पसरवायचा याला जन आशीर्वाद म्हणत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राणेंचे विधान आवडणार नाही असे भुसे म्हणाले. तर ही भाजपची सोची समझी चाल असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कुणाला तरी पुढे करून राज्याला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम केलं जात आहे. हा राज्यातील जनतेचा हा अपमान आहे. राज्यात सत्ता पालट होत नाही. मुख्यमंत्र्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे भाजपकडून जाणीवपूर्वक बदनामीचं काम केलं जात आहे असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.