Dispute Over Vajpayee Statue In Mumbai : अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यास परवानगी नाकारली.. भाजप आक्रमक - MP Gopal Shetty
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : कांदिवली पूर्व द्रुतगती महामार्गावर ( Kandivali East Expressway ) आकुर्ली रेल्वे स्टेशनसमोर ( Akurli Railway Station ) १४ हजार चौरस फूट जागेत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Ex Pm Atal BIhari Vajpayee ) पुतळा भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असताना राज्य सरकारने ऐनवेळी पुतळ्यास परवानगी नाकारली. याचा निषेध करत खासदार गोपाळ शेट्टी ( MP Gopal Shetty ) यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुतळा जोपर्यंत बसवला जात नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे शेट्टी म्हणाले.