Vasant Panchami 2022 : श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी - vitthal rukmini wedding ceremony
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर : श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा आज पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी मंदिर समिती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दुपारी बारा वाजता लग्न घटिका सुरू होणार आहे. वसंताची चाहूल लागते म्हणून माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. हाच दिवस श्री विठ्ठल- रुक्मिणीचा विवाह सोहळा म्हणून साजरा करतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, नामदेव पायरी फुलांच्या माळांनी सजला आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला विवाहानिमित्त शाही पोशाखही तयार करण्यात आला आहे. कोरोना नियमांचे पालन करून हा विवाह सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे