ETV Bharat / state

मनोज जरांगेंची चिथावणीखोर भाषा; ओबीसी नेते आक्रमक, लक्ष्मण हाकेंनी दिला 'हा' इशारा - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेध मोर्चात चिथावणीखोर भाषा वापरली. त्यावरुन ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना इशारा दिला आहे.

Santosh Deshmukh Murder Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 10:45 AM IST

Updated : Jan 6, 2025, 11:40 AM IST

पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर अनेक ठिकाणी मोर्चे निघताना पाहायला मिळत आहेत. परभणी इथं झालेल्या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मनोज जरांगे यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केली. त्यानंतर आता ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. "अशी चिथावणीखोर वक्तव्यं करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल," असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्ण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा : परभणीच्या आंदोलनात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मनोज जरांगे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य करताना घरात घुसून मारण्याची भाषा वापरली. यावरुन ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावरुन टीका केली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, की "मनोज जरांगे यांनी घुसायची भाषा आम्हाला करू नये, तुमच्यात दम असेल तर कुठं घुसायचं ते सांगा, अशी चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा. अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल," असा इशारा यावेळी हाके यांनी दिला आहे.

आता मोर्चाला प्रतिमोर्चा काढणार - बाळासाहेब सानप : मनोज जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनीही टीका केली. "राज्यात जो जातीय तेढ निर्माण झाला आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेणार आहोत. आता मोर्चाला प्रतिमोर्चा आणि उत्तर आमच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जाणूनबुजून वंजारी समाजाला टार्गेट केलं जात आहे. अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी करू नये," असा इशारा यावेळी बाळासाहेब सानप यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा :

  1. संतोष देशमुख हत्याकांड : सुरेश धस यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'आका वापरायचा 17 मोबाईल फोन'
  2. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा मोठा आरोप; म्हणाले ".... यांनी मला सीआयडी कार्यालयात चुकीची वागणूक दिली"
  3. मुख्यमंत्री आवरा त्यांना…”, मनोज जरांगे पाटील यांचा 'कुणासाठी' इशारा?

Last Updated : Jan 6, 2025, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.