हैदराबाद : कर्मचारी निवड आयोगानं अद्याप SAC मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरती परीक्षा 2024 (SSC MTS 2024) चा निकाल जाहीर केलेला नाही. निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. एमटीएस आणि हवालदार भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी कर्मचारी निवड आयोगानं अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. निकाल तपासण्यासाठी जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक आवश्यक असेल. या भरती अंतर्गत, 9583 MTS आणि हवालदार पदे भरली जातील, त्यापैकी 6144 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) आणि 3439 हवालदार पदासाठी भरती होणार आहे.
कधी झाली परिक्षा : ही परीक्षा 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली. ही संगणक आधारित परीक्षा दोन सत्रांमध्ये विभागली गेली होती, प्रत्येक 45 मिनिटे कालावधीची होती आणि त्याच दिवशी घेण्यात आली होती. प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे होते. दुसऱ्या सत्रातच या परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंगची तरतूद होती. तात्पुरती उत्तर की 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2024 होती.
वेतन : SSC MTS पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 18,000 ते 22,000 रुपये मासिक वेतन मिळेल. परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार शारीरिक सहनशक्ती चाचणी (PET) आणि शारीरिक मापन चाचणी (PMT) साठी पात्र असतील. लक्षात घ्या की पीईटी/पीएमटी फक्त हवालदार पदासाठी घेतली जाईल एमटीएस पदांसाठी घेतली जाणार नाही.
एसएससी एमटीएस निकाल 2024 : एसएससी एमटीएस आणि हवालदार निकाल 2024 चा निकाल कसा तपासायचा-
- 1. सर्व प्रथम उमेदवाराला आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जावं लागेल.
- 2. यानंतर तुम्हाला रिझल्ट टॅबवर क्लिक करावं लागेल.
- 3. यानंतर तुम्हाला MTS आणि Havaldar Result 2024 लिंकवर क्लिक करावं लागेल.
- 4. यानंतर तुम्हाला SSC MTS 2024 Result PDF लिंकवर क्लिक करावं लागेल.
- 5. आता तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल.
- 6. आता तुमचे गुण, रँक आणि निवड स्थिती तपासा.
- 7. आता निकाल डाउनलोड करा.
निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा द्यावी.
हे वाचलंत का :