अजित पवारांचा निर्णय पक्षविरोधी, त्यांना मतदार कधीही पाठिंबा देणार नाहीत - शरद पवार - शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - 'अजित पवारांचा निर्णय पक्षविरोधी, शिस्तभंगाचा आहे. त्यांच्यासोबत जे गेले त्यांच्यावर कारवाई होणार. पक्षाचे जे सदस्य त्यांच्यासोबत जाणार असतील त्यांना माहीत असायला हवे, की पक्षांतर बंदी कायदा आहे. त्यानुसार सदस्यत्व रद्द होते. त्यांच्या मतदारसंघातले मतदार त्यांना कधीही पाठिंबा देणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ते वाय. बी. सेंटरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'अशा प्रसंगातून मी अनेक वेळा गेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता भाजपबरोबर जाणार नाही याचा मला विश्वास आहे. भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल,' असे पवार पुढे म्हणाले.